Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Tuesday, 7 August 2012

श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा


रुद्रसेवा
ज सोमवार, तोही श्रावणातला. दर सोमवारी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे रुद्रसेवा असते. प्रत्येक श्रद्धावान या रुद्रसेवेमध्ये सहभागी होऊ शकतो. हा विधी चालू असताना इतर स्तोत्रांच्या व्यतिरिक्त ११ वेळा श्रीरुद्रपठण केले जाते व त्यावेळी प्रत्येक श्रद्धावान श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक करू शकतो आणि पूजनात सहभागी होऊ शकतो. ही मूर्ती बापूंच्या (अनिरुध्दसिंह) देवघरातील असून, दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे सर्व श्रद्धावानांच्या दर्शनाकरिता आणली जाते. श्रीहरिगुरुग्राम येथे नित्य उपासना झाल्यानंतर ह्याच मूर्तीचे पूजन होते व सदगुरु बापू (अनिरुद्धसिंह) सुद्धा त्यांचे प्रवचन सुरू होण्या आधी ह्या मूर्तीचे पूजन करून मग प्रवचनाला सुरुवात करतात.

रुद्रसेवा
दर सोमवारी होणार्‍या ह्या रुद्रसेवेमध्ये ११ भक्तांना सहभागी होता येते. फक्त श्रावण महिन्यातील सोमवारी १६ श्रद्धावानांसाठी अभिषेक व पूजनाची सोय करण्यात आली आहे.

ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

त्याचबरोबर श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे श्रद्धावान खालील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतात.

१) पुष्प सेवा:
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानातर्फे, सेवेच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील सर्व देवतांना हार व पुष्प अर्पण केली जातात. त्याचबरोबर, त्या श्रद्धावानाला श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील "श्रीत्रिविक्रमाला" स्वत:च्या हस्ते हार अर्पण करता येतो.

सेवेच्या दिवशी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌तर्फे त्या श्रद्धावानास श्रीफळ प्रसाद स्वरूपात देण्यात येते. सेवेच्या दुसर्‍या दिवशी श्रद्धावान, त्याच्या तर्फे आदल्या दिवशी अर्पण केलेली सर्व पुष्पं व हार प्रसादस्वरूपात घरी नेऊ शकतो. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सकाळी ११.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

२) आरती सेवा (सायंकाळची):
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानास श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे सायंकाळी गाभार्‍यातील सर्व देवतांची, तसेच श्रीत्रिविक्रमाची आरती करावयास मिळते. आरती खालील क्रमाने घेतली जाते.

अ) साईनाथांची "आरती साईबाबा.." ही आरती
ब) सदगुरु बापूंची (अनिरुद्धसिंह) "आरती अनिरुद्धा.." ही आरती
क) सदगुरु बापूंची (अनिरुद्धसिंह) "ॐ जय अनिरुद्ध प्रभो.." ही आरती

ही आरती म्हणतेवेळी श्रद्धावानांना श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌तर्फे हातात आरतीचे तबक दिले जाते व त्यांना स्वहस्ते देवतांना ओवाळता येते. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ७.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

३) श्रीदत्तकैवल्य याग सेवा:
श्रीदत्तकैवल्य याग
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणार्‍या श्रद्धावानास श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथे दर शनिवारी संपन्न होणार्‍या "श्रीदत्तकैवल्य याग" ह्या विधीमध्ये व्यक्तिगतरित्या सहभागी होता येते. ह्या विधीमध्ये इतर स्तोत्रांव्यतिरिक्त श्रीदत्तमालामंत्राची २६ वेळा अशी दोन आवर्तनं होतात.

ह्या सेवेसाठी एकावेळी एकूण १० श्रद्धावान सहभागी होऊ शकतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ५.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

४) दीपमाळ सेवा:
सेवेचे स्वरूप: ह्या सेवेमध्ये भाग घेणारे श्रद्धावान सूर्यास्तानंतर श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये प्रथम पणत्या प्रज्ज्वलित करतात व त्यानंतर त्याच पणत्या श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मधील दीपमाळेवर लावतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सायंकाळी ६.३० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

५) श्रीचण्डिका हवन:
श्रीचण्डिका हवन
ह्या विधीमध्ये श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌च्या प्राकारात बसून चण्डिकामातेसमोर हवन करू शकतात. हवन करतेवेळी श्रीआदिमाता शुभंकर स्तवन आणि श्रीआदिमाता अशुभनाशिनी स्तवनाची अखंड आवर्तनं चालू असतात. प्रत्येक आवर्तनानंतर सदगुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) आवाजातील स्वाहाकार मंत्र लावला जातो. एकूण ३ घटिका, म्हणजे ७२ मिनिटांसाठी हे हवन चालू असते.

ह्या सेवेसाठी एकावेळी एकूण ४ श्रद्धावान सहभागी होऊ शकतात. ह्या सेवेसाठी श्रद्धावानाने सकाळी ८.०० वाजता श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये हजर राहणे आवश्यक असते.

वरील सर्व सेवांसाठी श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये सकाळी ८.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत आगाऊ नोंदणी करू शकतात. 
हरि ॐ

19 comments:

Jyotsna Matondkar said...

Hari om Samir Dada !

Shree ram for sharing this information.

Subodhsinh said...

Shreeram Samirdada .. very useful information .. specialy for out of mumbai Shraddhavans ... hari om

Manish Mehta said...

Hari Om dada. Shri Ram.

Piyush Muley said...

Shreeram dada.Till date I Don't know these types of seva SAKSHAT at Shree gurukshetram for all shradhhawans. shreeram for sharing info.

Ajitsinh Padhye said...

Hari Om Dada. Shreeram for sharing this information. The very fact that we can do Abhishek on Shree Dattatreya's idol while performing Rudra seva in the most sacred premises of Gurukshetram is itself a big benefit for all Shraddhavans bestowed by Sadguru Bapu. The photos attached in your note also project the deep engrossment of Shraddhavans performing the Rudra. Hari Om.

Bhushan said...

Hari OM Dada!!!

Shriram for sharing such valuable information

ashishsinh said...

shreeram poojya samir dada...great to get all information in one click..this sewa possibilities are too good...who will not want to be part..shreeram....ashishsinh and rupaliveera banerji..lucknow

dilesh jagtap said...

Shreeram Samirdada For such Important Information...Hari om

aditya sawant said...

Hari Om Dada kharcha hyaa sarva seva Bapuni amhha sarvansathi SHREE ANIRUDDHA GURUKSHETRAM madhye khupach sahaj ritya dilya ahete ..and its just BAPUS grace we are the most fortunate humans to get such a big boon in this birth and that too when HE is in all of us as SAGUN SAAKAR ....SARVASAMARTHAM SARVARTHA SAMARTHAM SHREE GURUKSHETRAM...

Sunny Sand said...

Shree Ram Dada! Very useful information- more so for visitors from outside Mumbai like us who are there for short time. Having this concise and clear information will help us planning our stay so as to have maximum utilisation of time for bhakti and seva.

Humble request to put in similiar details for Juinagar....

Hari Om!

Sandeepsinh

Anonymous said...

Shree ram for giving valuable information From Priyanka Sawant

MADAN said...

Shree Ram for Sharing and Giving Detailed SEVA information which we NRI Looking for for many days
Hari Samir dada when we Visit Mumbai will definately make some SEVA Hariom
Madan & Saroj Dubai Upasna Kendra

Amit Joshi said...

Hari Om Sameer dada. The information is really helpful and i am sure many shraddhavaans will take an opportunity for seva because of this info.
I would like to know if there are any options to register for such sevas for shraddhavaans staying out of india and planning to come to mumbai for a week or so in future?
Shree Ram,

CURRENT said...

हरि ॐ दादा,
तुम्ही तुमच्या ब्लॉगवर रोज काहीतरी नवीन टाकत असता....सर्वच पोस्ट व त्यातील विषय खूप वेगळे आणि वैशिष्ठपूर्ण अशाच असतात..... आम्ही अक्षरश: वाट पाहत असतो की, आज तुम्ही काय टाकले आहे ते बघायला.... आज तर काय....‘श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा’..... मस्तच...
‘श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ सेवा’ या पोस्टमुळे आम्हा सर्व श्रद्धावानांना संपूर्ण गुरूक्षेत्रम्‌ मधील ’रुद्रसेवा’, ‘पुष्प सेवा’, ‘आरती सेवा (सायंकाळची)’, ‘श्रीदत्तकैवल्य याग सेवा’, ‘दीपमाळ सेवा’, ‘श्रीचण्डिका हवन सेवा’ या सर्व सेवांची माहिती मिळाली.... श्रीराम ही माहीती तुम्ही ब्लॉगवर शेअर केल्याबद्दल.....

Sangitaveera Vartak

Maneeshaveera Sukthankar said...

Hari Om Dada,
This information will surely benefit everyone to plan and participate in the sevas as per the choice. Knowing the importance while performing the seva gets one involved in it. By Bapu’s Grace and His Unconditional love for all, we can participate in sevas with so much ease which otherwise may have required us to follow hard and fast resrtrictions and would have not been so easy ! ShreeRam !

Harshada Kolte said...

Hari Om dada, shreeram for sharing such valuable information. Many shraddhavans were actually unaware of all this sevas. Shraddhavans are keenly interested to participate in sevas, and your blog is really helping us all to understand various sevas and activities and urging us to participate in more and more sevas. Shreeram

Nandaichi Pallavi********** said...

Hari Om dada & Shri Ram for Sharing this Most beautiful information & Opportunities of participating in it as per our convienece & Really awaiting always for your new post which will really something diffrent & most beautiful things for us,because of this lots of information we daily received which is really helpful for us.So always be with us in this way.

Pallaviveera Kanade

Naina Tushar said...

Shree ram dada..
Now every shraddhavan will be aware of all sevas which P.P. Bapu made us available at Shree Aniruddha Gurukshetram...
after reading this really feeling his love for us...
MADARTH KITI ZATATO MAZA ANIRUDDHA...

Anonymous said...

हरि ओम दादा, आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेली सर्व उपयुक्त माहिती सर्व श्रद्धावान भक्तांस रोज मिळतेच त्याबद्दल श्रीराम. परंतू एक गोष्ट सांगावीशी वाटते ती की जे संगणक हाताळत नाहीत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यामुळे संगणक घरात नाही असे बरेच श्रद्धावान अश्या सेवेपासून वंचित राहत असावेत त्यासाठी एक छोटीशी सूचना आहे की हीच माहिती सर्व केंद्र प्रमुखांस दिल्यास किंवा सूचना म्हणून पाठविल्यास ते शनिवारी म्हणजे सांघिक उपासनेच्या वेळी सूचना वाचतांना याचा उल्लेख करतील आणि त्याचा सर्व श्रद्धावान भक्त लाभ घेतील अशी आशा आहे. एक छोटासा बदल सुचवावासा वाटतो तो असा की या सेवेचे शीर्षक बदलून त्यास "श्रीगुरुक्षेत्रम येथे श्रद्धावानांस रोज सुवर्ण संधी" असे करावे असे वाटते !

जगदीशसिंह पटवर्धन,बोरिवली(प)