Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Friday, 14 September 2012

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ गणेशोत्सवll हरि ॐ ll
काल, गुरुवारी बापू (अनिरुद्धसिंह) प्रवचनाकरिता श्रीहरिगुरुग्रामला येऊ शकले नाहीत आणि त्यांनी त्यांच्या घरच्या गणपतीची म्हणजेच श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथील गणेशोत्सवाची सूचना मला करायला सांगितली. बापूंच्या घरच्या गणपतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल. बापूंनी त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना ह्या गणेशोत्सवाचे आग्रहाचे आमंत्रण केले आहे. ह्या गणेशोत्सवाचे विशेष म्हणजे प्रत्येक श्रद्धावानाला बापूंच्या घरच्या गणेशाबरोबरच श्रीमूलार्क गणेशाचे व त्याचबरोबर दरवर्षी ठेवल्या जाणार्‍या स्वयंभू गणेशाचे ही दर्शन घेता येईल.

सर्व श्रद्धावान बापूभक्तांकरिता बापूंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणे ही एक पर्वणीच असते.
श्रीसाईसच्चरितात म्हटल्याप्रमाणे,
गुरुनाम आणि गुरुसहवास l गुरुकृपा आणि गुरुचरण पायस l
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास l महत्प्रयास प्राप्ती ही l

आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ह्या ओवीमध्ये ३र्‍या चरणामध्ये गुरुगृहवास ही सर्वात शेवटी येणारी गोष्ट आहे. ह्या ओवीत म्हटल्याप्रमाणे सर्वच गोष्टी महत्प्रयासानेच प्राप्त होतात. पण त्यात सुद्धा गुरुगृहवासाची संधी भक्तांना मिळणं ही खूपच कठीण गोष्ट असते आणि सद्‌गुरु बापूंनी सर्व श्रद्धावान बापूभक्तांना ही सहजपणे उपलब्ध करून दिली आहे. ह्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे.

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ गणेशोत्सव (२०१२) कार्यक्रम

१) श्रीगणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, म्हणजेच हरतालिकाच्या दिवशी (मंगळवार, १८-०९-२०१२) :
आगमन मिरवणूक : सायंकाळी ५.०० वाजल्यापासून अमरसन्स, बांद्रा येथून
श्रीगणेशाच्या आगमनाची मिरवणूक ही, एक आगळीवेगळी मिरवणूक असते. अनेक श्रद्धावान भक्त ह्यात सहभागी होतात.

२) श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी, म्हणजेच श्रीगणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी (बुधवार, १९-०९-२०१२) :
श्रीगणेशपूजन : सकाळी ९.०० वाजल्यापासून
दर्शन : सकाळी ११.०० वाजल्यापासून ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत
महाआरती : रात्रौ ९.०० वाजता

३) ऋषीपंचमीच्या दिवशी, म्हणजेच श्रीगणेशोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (गुरुवार, २०-०९-२०१२) :
दर्शन : सकाळी ९.०० वाजल्यापासून ते रात्रौ ८.०० वाजेपर्यंत

४) श्रीगणेशोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी (शुक्रवार, २१-०९-२०१२) :
दर्शन : सकाळी ९.०० वाजल्यापासून ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
पुनर्मिलाप मिरवणूक आरंभ : दुपारी ४.०० ते ४.३०च्या दरम्यान

आपल्या सर्वांना परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा ह्यांच्या वतीने ह्या गणॆशोत्सवाच्या आगमनाच्या मिरवणूकीचे व त्याचप्रमाणे पुनर्मिलाप मिरवणूकीचे आग्रहाचे आमंत्रण.

ll हरि ॐ ll

7 comments:

hari om said...

hari om bapuraya
ganapati bappa morya

Nandan Bhalwankar said...

श्रीराम दादा, या सुवर्ण संधीचा आम्ही श्रद्धावान नक्कीच लाभ घेऊ.

nileshlok2025 said...

Hari Om Dada,

Nakkich amhi hya aaplyach gharchya ganapatichya darshanacha laabh ghevu. Hi amha sarvansathi ek sukhachi parvanich aste.
Tyaach barobar dada ek request aahe, Hya divsat jo navas karnyaachi sandhi milte tyasambadhi mahiti dyavi. Jya mule tyacha laabh jastit jast shraddhavaan bhaktanaa gheta yeil.

Mrs. Rakshaveera Sandeshsinh Shingre said...

हरि ओम दादा,
आम्ही नक्की येणारच श्री गुरुक्षेत्राम येथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला...लहानपणापासूनच खूप इच्छा होती कि गणेशोत्सव आपल्या हि घरी साजरा व्हावा...आपण हि बाप्पा सोबत खूप सारी मज्जा करावी..पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही...पण म्हणतातना आपल्या बाळांचा हट्ट ती अनिरुद्ध मुली पूर्ण करतेच...आणि आज मी माझ्या हक्काच्या घरी गणेशोत्सवाचा आनंद घेणार...खूप आतुरतेने वाट पाहतेय मी गणुबापाच्या आगमनाची... I LOVE U BAPPA....

Ravi Raj Gawde said...

Hari Om Dada ,

Akaran Karunya Of Our BapuRai...

Sangitaveera Vartak said...

हरि ॐ पुज्य दादा,
तुमच्यामार्फत आम्हा सर्व श्रध्दावानांना बापूंकडून गणपतीचे आमंत्रण मिळाल्याबाबत श्रीराम....
सद्‌गुरुंच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याचे हे भाग्य आम्हा श्रद्धावानांना लाभणार यासारखी दुसरी आनंदाची ती कुठली गोष्ट? खरंच सद्गुरूच्या घरचे फोटोतून जरी दर्शन घेतले तरी कीती समाधान वाटते आणि गणपतीदरम्यान तर प्रत्येक श्रद्धावानांना आपल्या सद्‌गुरुंच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळणार...... अहो भाग्यच....
तुम्ही साईचरित्राची ओवी तुमच्या पोस्टमध्ये टाकली आहे....... त्यात म्हटले आहे त्याप्रमाणे खरंच...... गुरुगृहवास हा सहजासहजी मिळत नसतो...... त्यासाठी खुप प्रयास करावे लागतात..... आणि इकडे आम्हा सर्व श्रद्धावानांना बापू....... त्यांच्या अकारण कारुण्याने कीती सहज उपलबध्द करून देतात.... धन्य ते आपल्या बापूंचे अकारण कारूण्य.......
आम्ही या सुवर्णसंधीचा नक्कीच लाभ घेऊ....... सोबत कार्यक्रमसुद्धा टाकल्यामुळे सर्वांना कधी जायचे तेही ठरविता येईल........
श्रीराम.......

Naresh Dev said...

Shreeram Dada.