Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Sunday, 2 September 2012

श्रीमांदारगणेशाचे स्वागत

ll हरि ॐ ll
 


श्रीमांदार-गणेश हे अत्यंत सिध्द व स्वयंभू असे गणेशाचे स्वरूप आहे. ह्यास मांदार-गणेश अथवा श्रीमूलार्क-गणेश अथवा श्रीश्‍वेतार्क-गणेश असेही म्हटले जाते. अशा श्रीमांदार-गणेशाच्या स्वागतासाठी / स्थापनेसाठी आवश्‍यक असलेले वेदोक्त विधी सांप्रत श्रीअनिरुध्द-गुरुक्षेत्रम्‌मध्ये चालू आहेत. साधारणत: बाजारात / इतरत्र ह्या स्वरूपातील अनेक मूर्ति बघावयास मिळतात; मात्र त्या तयार केलेल्या किंवा कोरलेल्या असतात. नैसर्गिक अवस्थेतील सिध्द व स्वयंभू स्वरूपातील श्रीमूलार्क-गणेश ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

रुईच्या झाडाच्या अनेक प्रजाती आहेत. नील रुई, श्‍वेत रुई ह्या त्यांपैकी काही. नील रुई म्हणजेच नील मांदार ही सर्वत्र उपलब्ध होते व श्रीशनिपूजनात आणि त्याचप्रमाणे शनिवारी श्रीमारूतीपूजनात ह्याचा उपयोग होत असतो. 

श्‍वेत रुई म्हणजे श्‍वेत मांदार झाड हे सिध्द जागीच बघायला मिळते व ह्याचा उपयोग अतिशय पवित्र पूजनात केला जातो. शिवाला ह्या श्‍वेत मांदाराची फुले अतिशय प्रिय आहेत. मांदार झाडाला नील मांदार अथवा श्‍वेत मांदार हे त्याच्या फुलावरून संबोधिले जाते.

अशा श्‍वेत मांदारझाडाच्या मुळाशी श्रीमांदार-गणेशाची प्राप्ति होते. साधारणत: २१ ते २५ वर्षे वयाच्या झाडाच्या मुळाशी परिपूर्ण स्वरूपातील गणेशाचे स्वरूप दिसू लागते. ज्या झाडाच्या मुळाशी असा श्रीमांदार-गणेश आहे, असा वृक्षा नित्य तजेलदार व पुष्पयुक्त असतो आणि म्हणूनच त्याचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे असते.


अशा झाडाचे परीक्षण करून व विशिष्ट विधी संपन्न करून पौर्णिमा किंवा मंगळवार किंवा गुरुवार ह्या दिवशी येणार्‍या संकष्ट चतुर्थीच्या रात्रौ चंद्रप्रकाशात चंद्रोदयानंतर तीन घटिकांच्या आत ही मूर्ति बाहेर काढाली जाते.

श्रीमांदार-गणेश मूर्ति काढण्यापूर्वी २१ दिवस अगोदर आमंत्रण व दिग्बंधन विधान केले जाते व त्यानंतर रजत (चांदीच्या) अस्त्रांनी श्रीमांदार गणेशाला बाहेर काढण्यात येते. हा विधी योग्य जाणकार व्यक्तिने अधिकारी व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक असते, अन्यथा त्याचे अनिष्ट अथवा विपरीत परिणाम होतात असा समज आहे.

अशा श्रीमूलार्क-गणेशाचे, श्रीमांदार-गणेशाचे, श्रीश्‍वेतार्क-गणेशाचे श्रीअनिरूध्द-गुरुक्षेत्रम्‌मध्ये आगमन होण्याची आपण सर्वजण वाट बघूया. ४ सप्टेंबर रोजी असणार्‍या अंगारकी चतुर्थीपासून सर्व श्रध्दावानांना श्रीमांदार-गणेशाच्या नित्य-दर्शनाचा लाभ घेता येईल. 
6 comments:

Sangitaveera Vartak said...

हरि ॐ दादा,
श्रीगुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीमुलार्क गणेशाच्या स्थापनेच्या विधी चालू आहे असे माहीत होते.... पण त्या विधीचे तुम्ही फोटो टाकल्यामुळे आम्हाला घरी बसल्या बसल्या बघायल मिळाले.... फोटो खुपच सुंदर आहेत..... खरचं तुमचा ब्लॉग हे आम्हासर्वांना आपल्या संस्थेची किंवा कार्यक्रमाची त्वरित आणि उचित माहीती मिळविण्याचे साधनही झाले आहे..... आज काही कार्यक्रम आहे का मग तुमच्या ब्लॉगवर नक्कीच येणार..... ही आमची खात्री आहे...... मग आम्ही तुमचा ब्लॉग ओपन करुन बघत असतो..... तसेच आजही ओपन करुन बघितला आणि अपेक्षेप्रमाणे..... तुम्ही ‘श्रीमांदारगणेशाचे स्वागत’ ही पोस्ट टाकली होती.... कालही टाकली होती.......
बापू(अनिरुद्धसिंह) आपली प्रत्येक छोटी छोटी इच्छा पूर्ण करतो..... माझी आज श्रीमुलार्क गणेशाच्या स्थापनेच्या विधी पहायची इच्छा झाली आणि माझ्या बापूने(अनिरुद्ध सिंह) ती लगेचच पूर्ण झाली.....
तुम्ही फोटोबरोबर टाकलेल्या नोटमुळे आम्हाला श्रीमुलार्क गणेशाची(मंदार गणेश) माहीती मिळाली..... श्रीराम तुम्ही ही माहीती आणि फोटो शेअर केल्यानेच आम्हाला याची कल्पना आली..... आम्ही आता आतुर झालो आहोत की तो आम्हा श्रद्धावानांना नित्य दर्शनासाठी कधी उपलब्ध होतो..... अर्थात ४ सप्टेंबर या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत.....
हरि ॐ

komal rangankar said...

Hari om Dada, Thank you so much for sharing such a valuable & Detailed information on shri Mularkaganesh.Hari om

Suneeta Karande said...

हरि ओम. दादा. श्रीमूलार्क-गणेशाची आपण इत्यंभूत माहिती वाचायला उपलब्ध करून दिली ,खूपच आनंद झाला. आपले बापू आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुर्मिळ दर्शन असलेल्या श्रीमांदार गणेशाच्या येत्या ०४ सप्टेंबर, २०१२ - अंगारकीच्या दिवसापासून) नित्य दर्शनाचा लाभ उपलब्ध करून देतात हे वाचून तर शब्द्च सुचत नाही, किती किती अगाध प्रेम भरभरुन बापू आपल्याला देतात , अनंत हस्त देता नंदावर घेशील किती दो कराने अशीच भक्ताची स्थिती होते जणू काही!!!!!!
श्रीअनिरुद्धराम !!!!!!!!!!!!!

Dr Umesh Shirodkar said...

Hari Om Dada

Thank you so much for sharing this valuable information about Shri Mularkaganesh. It is such a great occasion that all bhaktas can take darshan of Shri Mularkaganesh from 4th sept onwards.
Hari Om

Jagdishsinh Patwardhan said...

हरि ओम दादा, नैसर्गिक अवस्थेतील सिध्द आणि स्वयंभू स्वरूपातील श्रीमूलार्क-गणेश ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. श्रीमूलार्क-गणेशाची दिव्य माहिती आपल्या ब्लोगवर उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल हरि ओम, श्रीराम. श्री मांदार गणेशाचा इतिहास, प्राप्त करण्याचे विधिवत मुहूर्त, तिथी, साधन यांची माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व श्राद्धावांनास उपलब्ध करून दिल्यामुळे श्री.मांदार गणेशाबद्दलच्या दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. परमपुज्य सदगुरु श्री अनिरुद्धांचे श्रद्धावान मित्रांवर असलेल्या अकारण कारुण्याचे श्री गणेश मांदारच्या रुपाने प्रगटीकरण आहे..!!हा नुसता योगायोग नाही तर ही त्याची योजनाच आहे. कारण अधिक भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या(अंगारकी)च्या पवित्र दिनी श्री गुरुक्षेत्रममध्ये नित्य दर्शनाच्या योगाला दुग्धशर्करा योगच म्हंटला पाहिजे.

Sushil Ubale said...

Hari Om! SamirDada

ShreeRam...

Am feeling very great for being especially with with you...as every time we all are receiving really Valuable information upon visiting your blog..... and again great day today that we have received information about Shri Mularkaganesh. All Bapu bhakta can take darshan of Shri Mularkaganesh from 4th sept onward... ShreRAM Bapu.....Its great occasion

With always my hands together in 'Namaskar' position saying Hari Om! to you Dada

Sushilsinh Ubale