Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Friday, 14 September 2012

रुद्रास आवाहन : बापूंनी (अनिरुद्धसिंह) केलेले कविता वाचन

श्रावण महिन्यातील शिवरात्री पूजनाच्या दिवशी परमपूज्य बापूंनी विचारले की, "कविश्रेष्ठ, श्री. भा. रा. तांबे ह्यांची श्रीरूद्रावरील खूप छान कविता आहे; ती कविता आज मिळाल्यास खूप चांगले होईल. हे ऎकताच सूचितदादांनी बापूंना ही कविता इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन दिली. त्यानंतर बापूंनी आम्हा सर्वांना ही कविता म्हणून दाखविली व ती मला मोबाईलवर रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. We really enjoyed it. It is special for everyone of us.

सर्वांसाठी बापूंनी म्हणलेल्या त्या कवितेची ऑडिओ क्लिप व टेक्स्ट येथे देत आहे. मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना ती नक्कीच आवडेल. 
(ऑडिओ क्लिप डाऊनलोड करण्यासाठी वर क्लिक करा)

२) टेक्स्ट

रुद्रास आवाहन
   
डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।
- कविश्रेष्ठ. श्री. भा. रा. तांबे

13 comments:

Mrs. Rakshaveera Sandeshsinh Shingre said...

Hari Om, DADA

Tonns of Shree Ram for sharing poem in Bappa's voice is there any option to download this link...plz dada...

preeti potnis said...

Hari om Dada

the poem is unbelievably Beautiful.....truly Bapuraya is doing so much for all his Shraddhavan Friends.

Shreeram,Shreeram,Shreeram

Akshay Mhatre said...

Dada ... first time ashee Kavita aikli (ani ti pun Bapunchya awajaat) mala kavitetle shabd farse nahi kalale ... maatra Bapunni jyaa ritine Kavita vaachli. .. Rudra chi taakad kai te kalale.

Kavita vaachan life madhe maage padlela ... Bapunni parat jaga kelai !

Our Bapu is really Great.

Shriram Bapuraya .

Samirdada .. Thanks a ton for the audio clip. Lots of Shriram
to you dear Dada.

Sunil Bhavsar said...

Shree Ram Dada. It is amazing experience to listen to Bapu's voice! Hari Om.

Suneeta Karande said...

हरि ओम , दादा. माझ्या लाडक्या देवाच्या आवाजातील हे रुद्र आव्हान खूप खूप आवडले ऐकायला अगदी मनापासून. मला शाळेपासूनच भा. रा. तांबे ह्यांच्या कविता खूप आवडायच्या. आता नुकतेच तांबे ह्यांची मधु मागशी माझ्या सख्यापरी , मधुघटच रिकामे पडती घरी ही कविता मनात सतत रुंजी घालत होती. परंतु वाटायचे आता तर माझ्या बापूरायाने मृत्युची भीती काढून टाकायला शिकविले , मग मी का ही कविता सारखी गुणगुणते आहे. बापूंनी तांबे ह्यांची ही कविता स्वत: वाचून जणू माझ्या शंकेचे निरसन केले. किती स्मर्तुगामी आहे माझा सदगुरुराया !!!!
तसेच बापूंच्या आवाजातील ही कविता आणि आवेश ऐकताना मातृवात्सल्यविंदानम मधील देवीसिंहाचीच आठवण जागृत झाली. साक्षात आदिमाता चण्डिकेने स्वत: रणरागिणी बनून महिषासुराचे केलेले रणकंदन, कालीमातेने चण्ड-मुण्डांना मारण्याआधी हत्तींवरील असुरांचा आणि अश्वारुढ सैन्याचा केलेला रणसंहारच साक्षात डोळ्यांपुढे साकारला.
दादा तुम्ही आमच्या बापूंच्या खूपच सुंदर, अप्रतिम अशा अविस्मरणीय खजिन्याची भेट आम्हांला नित्य नूतन देत आहात. खरेतर, हे सर्व काही आम्हांला कधीच कळू शकले नसते, पण केवळ आणि केवळ तुमच्या असीम औदार्यामुळेच हे आम्हां सर्वांना सहज प्राप्त होत आहे.
मन:पूर्वक अनंत श्रीराम !!!!!!!!

Rakshaveera Sandeshsinh Shingre said...

Hari Om Dada, Khup Khup Khup Khup Shree ram..:D

Sandeshsinh Shingre said...

Hari Om Dada,

Bappa chya avajat itki chaan kavita ani ti hi Keerat Rudra Bappa var aaj aaikayla milali tasech download hi karnya che bhagya milale..tya baddal khup Shree Ram

Megha said...

हरी ओम

समीरदादा

तुमचा ब्लॉग म्हणजे आम्हा सर्व बापू भक्तांसाठी खजिन्याची पेटी आहे.

जी उघडली कि अनमोल रत्नांची प्राप्ती होते. आणि बापूंच्या आवाजातली रुद्राची कविता म्हणजे त्या खाजीन्यातला हिरा.

हि खजिन्याची पेटी सर्व बापू भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल अगदी मनापासून श्रीराम .

हरी ओम

bhushan.amberkar said...

shree ram............hari om.....................

Swapnil said...

हरी ओम दादा, शतशः श्री राम! फक्त तुमच्यामुळे आम्हाला बापूंच्या आवाजातील हि रुद्र कविता ऐकावयास मिळाली. खरच ह्या कवितेच्या श्रवणाचा आनंद काही औरच आहे. तुमच्या ह्या विविध पोस्टमुळेच आम्हाला खर्या अर्थाने "गुरु सहवास" लाभतो आहे.

Bhushan said...

Its really amazing experience listening to bapu's voice.


Shriram dada for sharing.

sachin rege said...

हरि ॐ दादा,

कविश्रेष्ठ भा. रा. तांबे ह्यांची 'रुद्रास आवाहन' ही सुंदर कविता आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल श्रीराम!

अतिशय भावोत्कट अवस्थेमध्ये तांब्यांनी लिहिलेली, नव्हे त्यांना स्फुरलेली ही कविता असावी. कोणाच्याही मनातील विचारांमध्ये ब-याच प्रमाणात त्याच्या आजूबाजूची परिस्थितीही कारणीभूत असते. ही कविता वाचताना प्रथमदर्शनी तरी असं वाटतं की कविच्या आजूबाजूची परिस्थिती इतकी अधर्माच्या, अनीतिच्या दिशेने प्रवास करते आहे की गोष्टी हाताबाहेर जात चालल्या आहेत व हे सर्व सहन न होऊन आणि हे सर्व बदलणं ही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे हे उमजून कदाचित त्यांनी थेट 'पावित्र्याचा रक्षणकर्ता' असणा-या त्या रुद्रासच आवाहन केलं आहे की -

हे रुद्रा, ये....येताना तुझं घोर तांडव करीत ये....दुष्टदुर्जनांच्या काळजात धडकी भरवणारा तुझा शंख फुंकत ये....सत्तेच्या घमेंडीने मत्त झालेल्या जुलमी शासकांच्या सत्तांना उलथून टाकण्यासाठी रौद्र रूप धारण करून ये....मातलेल्या सत्ताधीशांपुढे काही न चालणा-या - क्षुद्र समजल्या जाणा-या श्रद्धावानांना तुझ्या खड्‌गाचं बळ देण्यासाठी ये....अधर्माने पिचलेल्या श्रद्धावानांना पुन्हा वैभवाचे दिवस दाखविण्यासाठी, तर ताकदीचा दुरुपयोग करणा-या शासकांना भिकारी बनविण्यासाठी ये....ज्यांनी पूर्वी राजा बनून इतरांच्या घरी दरोडे घातले (म्हणजे ज्या आपल्या नागरिकांचं रक्षण करणं हे राजाचं काम असतं, ते विसरून उलट आपल्या प्रजाजनांच्या मुळावरच उठलेल्या)अशा राजांना तू पूर्वी नरसिंह बनून फाडले आहेस....आताही ज्याचं माप त्याच्याच पदरात घालण्यासाठी (करावं तसं भरावं हा नियम लावून) तू ये रुद्रा! ....

(हा केवळ मला प्रतीत झालेला एक सरलार्थ आहे, ह्यातून अजूनही अर्थ निघू शकतील).

इतकी सुंदर 'टाईमलेस' कविता आमच्याशी शेअर केल्याबद्दल व मुख्य म्हणजे बापूंच्या आवाजात ती ऐकण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा श्रीराम, दादा!

Prakash Hase said...

Hari Om, Dada,

Rudra chi kavita kharach tya rudravishye kititari sangun jate.

bapunchy aawajat tar ti adikach spuran dete.


Jay shree Ram...