Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Wednesday, 12 December 2012

बापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट - मातृवात्सल्य उपनिषद

॥ हरि ॐ ॥

दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, "हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून आवश्यक आहे ते, ते सगळेच्या सगळे ह्या उपनिषदामध्ये आहे."

मग बापूंनी "सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते" हा श्‍लोक / मंत्र म्हणून दाखवला व अत्यंत मनापासून सांगितले की सर्व मंगलता, सर्व पुरुषार्थांची साध्यता देणारे हे उपनिषद आहे. बापू पुढे म्हणाले, "हे जे उपनिषद माझ्या आईने माझ्याकडून लिहून घेतले आहे ते खरचं सांगतो, अधाश्यासारखे वाचा. तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हांला बाहेर काढून ते तुम्हांला चांगल्याच मार्गावर घेऊन जाणार."
आपण सर्वजण अत्यंत प्रेमाने मातृवात्सल्यविंदानम ग्रंथाचे पठण करतो. त्याच प्रेमाने या उपनिषदाचे पठण केल्यास, बापूंच्याच शब्दात म्हणायचे झाल्यास "अधाश्यासारखे वाचल्यास" बापूंना अत्यंत आवडेल. वर्ष २०१२ संपत असताना जग अराजकाच्या उंबरठ्यावर असताना सर्व श्रद्धावानांना आधार देईल, सांभाळून घेईल असे हे उपनिषद नक्कीच बापूंनी दिलेली फार मोठी नविन वर्षाची भेट आहे आणि मोठ्या आईचे कृपाछत्र आहे.

॥ हरि ॐ ॥

12 comments:

Pravin Amrutkar said...

hari om dada bapu

Anant Gawali said...

Hari Om Dada, I am sure every Shraddhavan is eagerly waiting for this blessing from Bapu and Mothi Aai. Every shraddhavan is aware of the pains that Bapu takes to get this great knowledge to his children with utmost simplicity.
ShreeRam

Unknown said...

Shree Ram Dada, eagerly waiting, but at the same time don't know how will i get a copy as i am in US...

Nitesh Chumbalkar said...

Hari Om Bapu

Sangitaveera Vartak said...

हरि ॐ पूज्य दादा,
सद्‌गुरू भक्ताच्या उद्धारासाठी किती किती म्हणून प्रयत्न करीत असतो.... किंबहूना झटत असतो.... याची ग्वाहीच या ’मातृवात्सल्य उपनिषद’ बद्दल सांगताना दिसून येते..... किती तळमळीने सांगतात आपल्याला.... आम्हा श्रद्धावानांना याशिवाय काय हवे असते?... हेच सर्वात महत्वाचे आहे.... आपल्याला आपला बापू त्याच्या ‘अकारण कारुण्याच्या’ स्वभावगुणानुसार भरभरून द्यायला तयार असतोच प्रश्न आहे तो आपण प्रत्येक श्रद्धावान किती घेऊ शकतो त्याचा. पण एवढे मात्र मी सांगू शकते- बापू ’मातृवात्सल्य उपनिषद’ ची आम्हाला जी संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्या सुवर्ण संधीच फायदा आम्ही नक्कीच करून घेऊ.... श्रीराम.... एवढी मोठी ग्वाही आपल्या बापूंनी आपल्याला दिली आहे तर मग आम्ही आमचे प्रयत्न करण्यास नक्कीच कमी पडणार नाही याची दक्षता घेऊ.... ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल परत खूप खूप श्रीराम बापू....

Girish Karulkar said...

कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
माझे सरकार जै देऊ सरते | न सरते ते कल्पांती ||

स्वतःतील उणीवा, कमतरता दूर करण्यासाठी व स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी “मातृवात्सल्य उपनिषद” हा रामबाण उपाय सद्गुरू बापूंनी आपल्याला दिला. पुढे येणाऱ्या कठीण काळात आपली बाळं सुरक्षित रहावी. कुठल्याच प्रकारचा अभाव आपल्या बाळांच्या जीवनात असू नये म्हणून या सद्गुरुरायाने नव वर्षाची आपल्याला हि अनमोल अशी भेट देऊ केली.
Personality Development ची कितीही पुस्तक वाचली आणि कितीही Seminar attend केले तरीही जे शक्य होणार नाही असे चांगले बदल हे “मातृवात्सल्य उपनिषद” प्रत्यक्षात घडवून आणेल यात शंकाच नाही.. १०८% !!!!!

vinay bhingarde said...

hari om dada

shree ram for sharing this information.

vinaysinh bhingarde

Anonymous said...

Hari Om!

Anything from Bapu is unparallal.

SANJIV said...

Anything from Bapu is always FULL OF LOVE for SHRADHDHAVANS.-Snjiiv

Yogesh Surve said...

फायनली बाप्पूनी त्याच्या बाळांसाठी अजून एक सोन्याची खान मातृवात्सल्य उपनिषदाच्या माध्यमातून दत्तजयंतीच्या दिवशी खुली करणार असल्याच सांगितलं, बाप्पा हे उपनिषद आम्ही नक्कीच तुम्ही सांगितल्या प्रमाणे अधाश्यासारखे वाचण्याचा प्रयास करु आणि तू ही ते हजारो पटीने आमच्या कडून वाचून घे हीच तुझ्या चरणी प्राथना.

I LOVE YOU BAPPU

Yogesh Surve said...

फायनली बाप्पूनी त्याच्या बाळांसाठी अजून एक सोन्याची खान मातृवात्सल्य उपनिषदाच्या माध्यमातून दत्तजयंतीच्या दिवशी खुली करणार असल्याच सांगितलं, बाप्पा हे उपनिषद आम्ही नक्कीच तुम्ही सांगितल्या प्रमाणे अधाश्यासारखे वाचण्याचा प्रयास करु आणि तू ही ते हजारो पटीने आमच्या कडून वाचून घे हीच तुझ्या चरणी प्राथना.

I LOVE YOU BAPPU

Yogesh Surve said...

फायनली बाप्पूनी त्याच्या बाळांसाठी अजून एक सोन्याची खान मातृवात्सल्य उपनिषदाच्या माध्यमातून दत्तजयंतीच्या दिवशी खुली करणार असल्याच सांगितलं, बाप्पा हे उपनिषद आम्ही नक्कीच तुम्ही सांगितल्या प्रमाणे अधाश्यासारखे वाचण्याचा प्रयास करु आणि तू ही ते हजारो पटीने आमच्या कडून वाचून घे हीच तुझ्या चरणी प्राथना.

I LOVE YOU BAPPU