Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Tuesday, 10 July 2012

गुरुपौर्णिमा - २



रात्र होत आली तरी सद्‌गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्‌गुरुत्त्वाच प्रतिक असणार्‍या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु - श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्‌गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्‍यावरील भावांवरुन समजून येते. खरच भक्त म्हणून पण कस असावं हे बापूंकडेच (अनिरुध्दसिंह) बघून शिकता येतं. 

English Version:
It was quite late in the night but the crowds were still pouring into a place already swarmed with people waiting for Sadguru Bapu's (Aniruddhasinh) darshan. Many arrived for the darshan after offering poojan to the 'Trivikram' – the representation of the principle that is the Sadguru. And soon it was time for the aarti. To begin with, Bapu (Aniruddhasinh) offered the aarti to His own Guru (the Master - Shreegurudatta). Every time that my Sadguru does so, He enters into the role of a 'bhakta', an ardent bhakta overwhelmed with intense love, His heart full with bhakti for His Guru. The intense love, the longing, the ache in Bapu's (Aniruddhasinh) heart (the 'aartata' in the 'aarti') reflects on His face – it is so evident. Truly, how ought a bhakta to be – that is what we learn from observing Him – even that..

बापूंच्या (अनिरुध्दसिंह) घरी होत असलेला श्री दत्तयाग - १



जच बापूंचा (अनिरुध्दसिंह) घरी ३ दिवसांच्या दत्तायागाला सुरुवात झाली. ह्या यागामध्ये 'ऎरणीमंत्राचं' पठण होऊन लाकूड एकमेकांवर घासून, इतर कुठल्याही साधनांच्या मदतीशिवाय अग्नि प्रज्वलित केला जातो. या यागाची सांगता तिसर्‍या दिवशी पूर्णाहुतीने होते. अशा प्रकारचा ३ दिवसांचा दत्तयाग बापूंच्या (अनिरुध्दसिंह) घरी वर्षातून दोनदा होतो. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) गाणगापूरच्या घरी ही अशाच प्रकारचा एक दिवसाचा याग होतो.



बापूंची (अनिरुध्दसिंह) श्रीगुरुंशी म्हणजेच श्रीदत्तात्रेयांशी असलेली बांधिलकी आपल्या सर्वांना माहिती आहेच. बापूंच्या परळ मधील क्लिनीकचं नाव "दत्त  क्लिनीक"चं होतं व तेच "दत्त क्लिनीक" हे नाव दादर व हॅपी-होम येथे पुढे चालू राहिलं. बापू (अनिरुध्दसिंह) परळ येथील श्रीदत्तात्रेयांच्या देवळात दर्शनाला नित्य जात असत हे सर्वांनाच माहिती आहे. हॅपी-होमला खालीही श्रीदत्तात्रेयांचीच मूर्ती आहे.

बापूंनी स्वत: लिहिलेल्या "मातृवात्सल्यविन्दानम्‌"च्या उपसंहारामध्ये बापूंनी स्पष्टपणे म्हटलं आहे, "अनिरुध्दाचे जीवन, जीवनातील प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवसातील प्रत्येक घटिका आणि अनिरुध्दाचा प्रत्येक श्‍वास श्रीगुरुदत्तात्रेयांच्या इच्छेलाच समर्पित आहे व प्रत्येक उच्छ्‌वास आदिमाता चण्डिकेच्या हुंकाराचा अर्थात हनुमंताचा दास आहे". साईनाथही आपल्या एका श्रेष्ठ भक्ताला सांगतात की, "ll दत्तासारिखें पूज्य दैवत l असतां सहज मर्गी तिष्ठत l अभागी जो दर्शनवर्जित l मी काय पावत तयासी ll"

ll हरि ॐ ll

The 3 day Dattayaag began yesterday (9th July 2012) at Bapu's (Aniruddhasinh) home. The special feature of this 'yaag' is that, accompanied by the recitation of the 'Airani Mantra' pieces of wood are rubbed against each other and fire is set alight without the use of any other substance or means (without any ignitable means or any substance at all apart from wood). This yaag culminates with a Poornahuti on the third day. At Bapu's (Aniruddhasinh) home here in Mumbai, this kind of a 3 day yaag happens twice every year. A one day Datta yaag happens at His house in Gangapur as well...