Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Saturday, 14 July 2012

बापूंची (अनिरुद्धसिंह) तपश्‍चर्या

गुरुपौर्णिमेच्या आधिच्या गुरुवारी बापूंनी (अनिरुद्धसिंह) आपल्या सर्व श्रध्दावान मित्रांना उद्देशून सांगितलं की त्यांच्या तपश्‍चर्येचा दुसरा खंड म्हणजेच ’उपासना खंड’ आषाढी एकादशी पासून सुरु होईल आणि तो ’उपासना खंड’ चालू झालाही. हा दुसरा खंड येत्या दसर्‍याला संपन्न होणार आहे. 

बापूंच्या (अनिरुद्धसिंह) सर्व श्रध्दावान मित्रांना बापूंच्या (अनिरुद्धसिंह) स्वतिक्षेम तपश्‍चर्येची कल्पना आहेच. मागच्या घटस्थापनेपासून बापूंची (अनिरुद्धसिंह) स्वतिक्षेम तपश्‍चर्या चालू झाली व रामनवमीला संपन्न झाली. ह्या तपश्‍चर्येची फलश्रुती म्हणजे सर्वांग ब्रम्हास्त्र आणि सर्वांग करुणाश्रय ह्या दोन गोष्टी प्राप्त करून घेणे. 

 
ही बापूंची (अनिरुद्धसिंह) तपश्‍चर्या मोठ्याआईच्या कृपेच्या परिणाम स्वरुप सर्वसंपन्न झाली व त्यायोगे आपल्या सर्वानांच रामनवमीच्या आधल्या रात्री श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌मध्ये मोठ्याआईचे अस्तित्व तीच्या उमटलेल्या चरणांना बघून अनुभवता आले.नरजन्माचें काय कारण?कालची दारासिंहाच्या मृत्युची बातमी सगळ्यांना दु:ख देऊन गेली. प्रत्येक भारतीय हळहळला, पण मरण हे जीवाची अपरिहार्यता आहे. साईसच्चरिताच्या ४३व्या अध्यायामध्ये हेमाडपंत आपल्याला हेच सांगतात.
जननापाठी चिकटलें मरण l एकाहूनि एक अभिन्न l मरण जीवप्रकृतिलक्षण l जीवाचे जीवन ती विकृती ll
- अध्याय ४३ ओवी ५२
मरण ही देहाची प्रकृति l मरण ही देहाची सुस्थिति l जीवन ही देहाची विकृती l विचारीवंती विचारिजे ll
- अध्याय ४३ ओवी ५६

पण मग हे जर असंच असेल तर जन्माला येऊन काय करायचं हा प्रश्‍न प्रत्येकाला पडू शकतो व पडतोच. जेव्हा लेखाजोखा करायची वेळ येते तेव्ह; "मी काय मिळविलं?" हा प्रश्‍न पडतोच. हा नरजन्म कशासाठी ह्या बद्दल हेमाडपंत लिहतात, 

आला कोठूनि आहे कोण l नरजन्माचें काय कारण l एथील बीज जाणे तो प्रवीण l त्यावीण शीण मज सारा ll
- अध्याय ८ ओवी १६
शाश्‍वत सुख आणि शांति l हेंच ध्येय ठेवूनि चित्तीं l भूति भगवंत हे एक उपास्ति l परमप्राप्तिदायक ll
- अध्याय ८ ओवी ३१ 

आणि म्हणूनच हेमाडपंत समजावून सांगतात हा नरदेह कसा वापरु नये आणि कसा वापरावा. 

आहार-निद्रादी चतुष्टय l यांतचि होता आयुष्यक्षय l मग श्‍वांनां-मानवां भेद काय l करा निर्णय विवेकें ll
- अध्याय ८ ओवी १२
मानावा तो केवळ चाकर l नका बैसवूं त्या डोक्यावर l लाड नं पुरवा निरंतर l नरकद्वार करु नका ll
- अध्याय ८ ओवी ३३ 

पुढे जाऊन कळकळीने सांगतात,
म्हणोनि हा नरदेह निर्मून l इश्‍वर झाला आनंदसंपन्न l कीं विवेकवैराग्यातें वरुन l नर मद्‌भजन करील ll
- अध्याय ८ ओवी ५२
विनाशीं नर करितां साधन l होईल अविनाशी नारायण l नरदेहासम साधनसंपन्न l दुजा न आन ये सृष्टी ll
- अध्याय ८ ओवी ५३ 

आणि म्हणून प्रत्येक भक्ताला पुढे जाऊन विनंतीही करतात,
म्हणून झालें न जो शरीरपतन l आत्मज्ञाननार्थ करा यत्न l नरजन्माचा एकही क्षण l उपेक्षून  टाकूं नका ll
- अध्याय ८ ओवी ७८ 

हेमाडपंतांनी "नरजन्माचा एकही क्षण" उपेक्षित राहू नये यासाठी काय केलं? हेमाडपंतांनी साईनाथांनाच विनंती केली.
मी तों केवळ पायांचा दास l नका करुं मजला उदास l जोंवरी ह्या देहीं श्‍वास l निजकार्यास साधूनि घ्या ll
- अध्याय ३ ओवी ४० 

पण ही अशी उच्च कोटीची विनंती हेमाडपंत का करु शकले असा प्रश्‍न आपल्या सारख्या सर्वसामान्य भक्तांना पडतो; आणि ह्याचे उत्तरही हेमाडपंतच आपल्याला देतात साईसच्चरिताच्या ४०व्या अध्यायामध्ये.
ध्यानीं मनीं साईचा ध्यास l हा तो निरंतराचा अभ्यास l सात वर्षांचा जरी सहवास l आंस न भास भोजनाचा ll
- अध्याय ४० अवी ११९

हा हेमाडपंतांचा "निरंतराचा" ध्यास आहे; ह्या जन्मातला, ह्याच्या आधिल जन्मातील ही आणि म्हणूनच कायमचाच (forever) प्रत्येक क्षणी हेमाडपंतांना ह्या साईचाच ध्यास होता. साईनाथ जेवावयास यावेत याचीच त्यांना "आस" होती; आणि म्हणूनच त्यांच्या करता "स्वप्न" हा भास नव्हता. म्हणून प्रत्येक साई भक्ताची वाट हेमाडपंतांच्याच वाटेने जाते.

ll हरि ॐ ll