Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Monday, 16 July 2012

Responses of Friends and of Followers of the Blog

Mrs. Harshada Kolte a follower of the blog has given a comment as under; which is self explanatory:

"हरि ॐ दादा, श्रीसाईसच्चरिताची खरी ओळख झाली ती प.पू बापूंच्या सान्निध्यात आल्यावर. पंचशील परीक्षेचा अभ्यास करता करता अनेक गोष्टींचा उलगडा झाला. हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठ भक्ताची लेखणी आमच्या जीवनाचा विकास करून आमच्या जीवनातील उजाड रानात नंदनवन फुलू लागले . दादा तुमचा ब्लॉग सुरू झाल्या पासून हा नंदनवन अजून बहरू लागलाय. तुम्ही ब्लॉग द्वारे ओव्यांवर करत असलेले मार्गदर्शन ह्यांनी आता श्रीसाईसच्चरित वाचण्यात , एक वेगळाच आनंद मिळू लागलाय. बऱ्याचश्या गोष्टींवर नीट मनापासून विचार करावासा वाटतो. आणि त्यातून श्रीसाईसच्चरित हे नुसतेच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी न वाचता मनाला , बुद्धीला विचार करून जीवनाला वळण लावणारा एक अतिशय मोठा खजिनाच आपल्या हाती आपल्या प.पू. बापूंनी दिलाय ह्याची जाणीव होऊ लागली आहे. म्हणूनच दादा तुम्हाला नम्र विनंती की आपण अशा प्रकारचे Discussion Forum सुरु करू शकता कां? ज्याद्वारे प्रत्येक श्रद्धावान भक्ताला ह्या गोड गुरूच्या शाळेतील अमृतकण वेचायला मिळू शकतील".