Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Saturday, 18 August 2012

श्री साईसच्चरित पंचशील परिक्षा

ll हरि ॐ ll

 ज दैनिक प्रत्यक्षमध्ये श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधनीतर्फे घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परिक्षेचा पेपर प्रकाशीत झाला. वर्षातून दोनदा होणार्‍या ह्या परिक्षांना हजारो श्रद्धावान वारंवार बसतात. फेब्रुवारी २०१२ मध्ये १२५९ श्रद्धावान जगभरातून परिक्षेला बसले. पंचशील परिक्षेचा प्रवास न संपणारा आहे. प्रथमा ते पंचमी आणि पुन्हा प्रथमा अशी पुन्हा - पुन्हा परिक्षेला बसण्याची संधी बापूंनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे नित्यनूतन असणार्‍या साईसच्चरिताप्रमाणेच परिक्षेला बसणार्‍या श्रद्धावानांची उत्तरे देखील नित्यनूतन असतात. दर वेळेस नवीन काहीतरी सापडत असते. श्री साईसच्चरित म्हणजे खजिना आहे आणि तो साईनाथांनी लुटण्यासाठी उघडा ठेवलेला आहे. आता त्यातून आपण किती लुटतो हे आपण ठरवले पाहिजे.