Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Monday, 20 August 2012

....आणि आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...ll हरि ॐ ll
नंदाचा उत्सव आणि उत्सवाचा आनंद हे ब्रीदवाक्य घेऊन परम पूज्य नंदाईने (माझ्या लाडक्या ताईने) ५ व ६ नोव्हेंबर २०११ रोजी आत्मबल महोत्सव साकारला. अगदी मंत्रमुग्ध करणारा हा असा हा महोत्सव होता. आपल्या तेरा बॅचच्या तेराशे सख्यांना सोबत घेऊन विलोभनीय, अविश्वसनीय आणि "महा" असा महोत्सव साकारला. यासाठी नंदाईसह तिच्या सर्व लेकींनी अहोरात्र मेहनत घेतली. या काळात ताईची (नंदाई) झोप जणू नाहीशी झालेली होती. दत्तगुरु आणि मोठी आई यांच्या आशीर्वादाने आणि परम पूज्य बापूंच्या (अनिरुद्धसिंह) पाठींब्याने ताईने ही किमया घडवून आणली. चांगल्या पवित्र हेतूने जेव्हा हजारो स्त्रिया एकत्र येतात तेव्हा काय घडू शकते याची झलक आम्हा सगळ्यांना या महोत्सवामुळे पाहण्यास मिळाली.