Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Sunday, 11 November 2012

Bapu Performing Aarti at Shree Dhanlaxmi Shree Yantra Poojan


Bapu performing aarti at Shree Dhanlaxmi Shree Yantra Poojan

Entry of Bapu at Shree Dhanlaxmi Shree Yantra PoojanBapu has arrived at Shri Harigurugram for Shree Dhanlaxmi Shree Yantra Poojan. Bhaktas can avail the benefit of darshan.

श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव

ll हरि ll

आपण सर्व जण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते 'श्रीयंत्र पूजन'.

प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवामध्ये आपापल्या घरातील श्री यंत्र घेऊन येतो उत्साव स्थळी येऊन त्या श्रीयंत्राची पूजन अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय त्याच्या पूजनाचे अनन्यसाधारण महत्व काय हे श्री मातृवात्सल्य विन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच उत्सवाच्या दरम्यान सांगितलेले श्रीयंत्र व त्याच्या पूजनाचे महत्व याची व्हिडीयो क्लिप सुध्दा देत आहे. 


आदिमाता चण्डिका (महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) या दोघींचे एकत्रित अधिष्ठान श्रीयंत्र' असून श्रीयंत्राच्या दर्शन-पूजनाने या दोघींची कृपा सहजपणे प्राप्त करता येते.

आद्य महर्षि कालातीत श्रद्धावान असणार्‍या अगस्त्य ऋषिंची धर्मपत्‍नी लोपामुद्रा' हिने श्रीसूक्ताच्या नित्यजपानेच श्रीयंत्राची रचना श्रीगुरु दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनानुसार केली आहे.

सर्व प्रकारचे सामर्थ्य आणि ऐश्वर्ये यांचा मूळ स्त्रोत आदिमता चण्डिका आहे. आदिमाता चण्डिकेचे सर्वसमर्थत्व आणि सर्व-ऐश्‍वर्यसंपन्नत्व श्री या तिच्या नामाने दर्शविले जाते. आदिमाता चण्डिकेने भक्तमाता श्रीलक्ष्मीस आपल्या भाळावरील कुंकुमतिलकात स्वस्तिकरूपाने धारण केले आहे.

श्रीयंत्रापासून मिळणारा लाभ सद्गुरुगम्य मानला गेला आहे. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाने सिद्ध केल्या गेलेल्या श्रीयंत्राच्या पूजन-दर्शनाने प्रपंच आणि परमार्थ आनंदमय बनवण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य आणि ऐश्‍वर्ये श्रद्धावान प्राप्त करतात.

श्रीयंत्राची केवळ उपस्थितीसुद्धा शुभ, ऐश्‍वर्यदायक, सामर्थ्यप्रद आणि अपरंपार फलप्राप्तिदायक मानली जाते. मग श्रद्धेने श्रीयंत्रचे दर्शन-पूजन घेणार्‍यास काय बरे प्राप्त होणार नाही? श्रद्धावान प्रेमाने श्रीयंत्र घरात ठेवतात आणि त्याच्या नित्य दर्शनाने त्यापासून शुभ स्पंदने प्राप्त करतात.

चण्डिकाकुलाची भक्ती अधिकाधीक दृढ करून अभ्युदय आणि नि:श्रेयस साधण्यासाठी श्रद्धावान धनत्रयोदशीला धनलक्ष्मी आणि श्रीयंत्र यांचे पूजन-दर्शन करतात. धनलक्ष्मीची कृपा श्रद्धावानास सर्व प्रकारचे धन श्‍वर्ये प्रदान करून जीवन धन्य करते. श्रीकृपेने म्हणजेच आदिमाता चण्डिका (महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) यांच्या कृपेने जीवनात नित्य दीपावलीचा प्रकाश, मांगल्य आणि आनन्द सदैव रहावा यासाठी श्रध्दावान या पूजनात सहभागी होतात.

श्रीगुरु दत्तात्रेयांनी लोपामुद्रेस श्रीयंत्राचा अधिष्ठानमंत्र सांगून त्याचा जप करण्याची आज्ञा केली.

हा मंत्र म्हणजे देवमाता आदिमाता चंडिका भाक्तमाता श्री लक्ष्मी यांचा एकरूप मंत्र आहे -

श्रीकमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं महालक्ष्म्यै नमो नमः।

ll हरी ll