Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Wednesday, 28 November 2012

E-Journals of Exponent Group of Journals Launchedll Hari Om ll


I feel very happy and proud to inform you that on 28th November, 2012, on the very auspicious occasion of Kartik Pournima (birthday of Bapu as per the Hindu Calender), we have launched the inaugural issues of the E-Journals, covering various disciplines. You can read the E-Journals at the following URL: http://aanjaneyapublications.com/publications.faces

Those who were fortunate to attend Bapu’s discourse on Ram Rajya on May 6, 2010, at Shree Harigurugram would have heard Bapu announcing the launching of Exponent Group of Journals, one of the projects, integral to Bapu’s vision of re-ushering in of Ram Rajya. Those of you who could not make it on that day, I’m sure, would have read the publication of Bapu’s pravachan on Ram Rajya.

The launching of the E-Journal is a quantum leap for us, in terms of bringing in technology to the Shraddhavaan friends of Bapu in a very user friendly format. However, let me tell you, this has not happened overnight. In the true implementation of Bapu’s teachings, we have taken small but sure steps in this direction, consolidating every step taken, before putting the next foot forward. At times, we had to alter the course, change directions, but all this has been part of putting the next step forward.

Our IT Team from Shree Aniruddha Upasana Foundation has indeed made us proud by daring to tread on uncharted territory and coming up with this unique offering. The following E-Journals will be uploaded:

1.   The Exponent Group of Journals for MBAs
2.   The Exponent Group of Journals for Professional Medicine
3.   The Exponent Group of Journals for Health & Health Services Information
4.   The Exponent Group of Journals for Chartered Accountants
5.   The Exponent Group of Journals for Shares & Stock Market
6.   The Exponent Group of Journals for General Engineering
7.   The Exponent Group of Journals for Information Technology
8.   The Exponent Group of Journals for Electronics

Those who are desirous of subscribing to any of more of these E-Journals can visit our website and subscribe to the journals by making payment through the payment gateway.

The E-Journals are available to anyone who desires to update their knowledge in the field of their choice. For instance, the E-Journal for Chartered Accountants will also cater to the information needs of non-CAs who, by virtue of their knowledge and experience, handle responsibilities normally reserved for a CA, and equally cater to aspiring CAs, pursuing the course.

I would appreciate it, if I could get feedback and suggestions, if any, so that we can constantly improve ourselves and do our bit in bringing Bapu’s vision to fruition. 

ll Hari Om ll

नित्य अनिरुद्ध पौर्णिमा!


ll हरि ll

निवार डिसेंबर २०१२ रोजी आपण श्रीहरिगुरुग्राम येथे अनिरुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. हा दिवस प्रत्येक बापूभक्तासाठी एक विशेष पर्वणी असते. हा दिवस आपल्या बापूंचा जन्मदिवस आहे आणि श्रद्धावानांसाठी, त्यांच्यावरच्या प्रेमापोटी आपले बापू संपूर्ण दिवस त्यांच्या मित्रांसाठी व्यतित करतात.

जे मंगल आहे, शुभ आहे, जे प्रत्येक श्रध्दावानाच्या न्‍नतीसाठी आणि उध्दारासाठी आवश्‍य आहे ते ह्या दिवशी श्रद्धावानांना अधिक सुलभ अधिक सहजपणे प्राप्त होते आणि म्हणूनच लाखोंच्या संख्येने श्रद्धावान ह्या दिवशी मिळणार्‍या बापूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेतात.

ह्या सोहळ्याची सुरुवात आपल्या ..डी.एमच्या परेडने होते. महिला पुरुष डी.एम.व्ही मिळून एकूण साधारण एक हजारच्या आसपास डी.एम.व्हीज्च्या शिस्तबद्ध आणि सुसूत्र पद्धतीने चालणर्‍या ह्या दिमाखदार परेडची मानवंदना बापू, नंदाई आणि सुचितदादा स्वीकारतात. उपस्थित श्रद्धावानांना प्रेरणा उत्साह देणारी अशी ही परेड असते.

श्रीरामरक्षा पठण कक्षही असतो. बापूंच्या देवघरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता हनुमंत ह्यांच्या मूर्तींवर अभिषेक करत असताना श्रद्धावान रामरक्षा स्तोत्र पठण करतात.

तसेच गार्‍हाणे ही घातले जाते. गार्‍हाणे म्हणजे आर्त अशी प्रेमाची हाक. आपल्या सद्गुरुला प्रत्यक्ष त्याच्याच उपस्थितीत अशी प्रेमाची साद घालण्याची संधी हा दिवस आपल्याला देतो.

आर्त सादेबरोबर आरतीही! आपल्या जागेवर बसून घरून आणलेल्या तुपाच्या दिव्याने सर्व श्रद्धावान सद्गुरु बापूंची आरती करू शकतात. प्रत्येक तासाला म्हटल्या जाणार्‍या आरतीच्या स्वरांसमवेत मनातले आर्त व्यक्त करायचे! बापूंपर्यंत ते पोहोचतेच. हजारो ज्योतींनी एकाच वेळेस बापूंना आरती केली जाते. बापूंना औक्षण करण्याची प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारा हा दिवस

बापूंना प्रिय असलेला आप्प्यांचा नैवेद्य अर्पण करून श्रद्धावान हा प्रसाद ग्रहण करतात.

ह्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीपासून बापूंनी सुरु करून दिलेले 'किरातरुद्र पूजन'. प्रथम बापूंनी पूजन केले त्यानंतर आपल्या सर्व श्रद्धावान मित्रांसाठी त्यांनी हे खुले करून दिले. आपल्या अग्रलेखांमधून वेळोवेळी बापूंनी ह्या सदाशिव-किरातरुद्राचे त्याच्या पूजनाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. श्रद्धावानांसाठी किरातरुद्र शिवगंगागौरी पावित्र्याला आधार देतात, त्याचा स्तंभ असतात जे जे अनुचित अथवा अपवित्र, त्याचे स्तंभन करतात. मानवी मनाच्या जंगलातील हिंस्‍त्र पशु अर्थात षडरिपु ह्यांची शिकार करणे हा ज्याचा छंद आहे, असा हा सदाशिव राघवेन्द्र! अनिरुध्द पौर्णिमेस केलेले ह्याचे पूजन विशेष महत्त्वाचे ठरते कारण ते मानवी जीवनात वरील सर्व मंगल घडवून आणते विकास साधून देते.

हा दिवस सर्वाथाने परिपूर्णच असतो. नामस्मरण, पूजन, अभिषेक, औक्षण, नैवेद्य आणि प्रत्यक्ष दर्शन अशी श्रद्धावानांना परवणी ठरणारा हा दिवस!

जन्मदिवस बापूंचा पण श्रद्धावानांना भरभरून भेटही तेच आम्हाला देतात! ह्या वर्षी बापू, नंदाई सुचितदादा ह्या तिघांच्याही आवाजात रेकॉर्ड केलेल्या स्तोत्रांची सी.डी. उपलब्ध होईल. ह्या सी.डी. बरोबर त्या स्तोत्रांची पुस्तिकाही असेल. तसेच 'साई निवास'ची सी.डी. आता हिंदी मध्ये मिळू शकेल. साई निवास ह्या वास्तुचे श्रद्धावानांच्या मनात विशेष असे स्थान आहेच परंतु अधिकाधिक श्रद्धावान भक्तांना ह्या सी.डी. मध्ये नमूद झालेल्या अनुभवांचा, गुणसंकीर्तनाचा आनंद मिळेलच पण सौ. मीनावैनींच्या आठवणींमधून मार्गदर्शनही मिळेल तेही सर्वांनाच सहज समजणार्‍या भाषेत.

ह्या दिवसाला "अनिरुद्ध पौर्णिमा" असे नाव सौ. मीनावैनींनीच दिले. ही पौर्णिमा 'अनिरुद्ध' आहे कारण ह्याचा प्रकाश अनिरुद्धाच्या प्रेमाचा असा शीतल प्रकाश आहे, जो प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या मनामध्ये, जीवनामध्ये पोहोचतोच. दु:खाचे रुपांतर आनंद धैर्यात करणारा हा प्रकाश आहे म्हणून मीनावैनी म्हणतात, "आता कैसी अमावास्या l नित्य अनिरुध्द पौर्णिमा".

सर्व श्रद्धावानांना अनिरुद्ध पौर्णिमेच्या अनिरुद्ध शुभेच्छा!

ll हरि ll