Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Monday, 31 December 2012

प्रत्यक्षचा नववर्षविशेषांक - "मी पाहिलेला बापू"श्रीदत्त जयंती विशेषांकानंतर लगेचच दैनिक प्रत्यक्षचा अजून एक येणारा विशेषांक म्हणजे नववर्षविशेषांक जो उद्या प्रकाशित होत आहे. गेल्या वर्षाच्या दैनिक प्रत्यक्षच्या नववर्ष विशेषांकाचा विषय होता, "मी पाहिलेला बापू". ह्या विशेषांकाला मिळालेल्या अफाट प्रतिसाद आणि डॉ. अनिरुध्दांविषयी अधिकाधीक जाणून घेण्याचे अधिकच वाढलेले वाचकांचे कुतूहल, यातूनच या वर्षाचा नववर्षविशेषांक देखील गेल्या वर्षीच्याच विषयास वाहिला आहे; तो म्हणजेच "मी पाहिलेला बापू". जानेवारी २०१२च्या "मी पाहिलेला बापू" या अंकातील काही निवडक गोष्टी येत्या नव्यावर्षात या ब्लॉगवर देण्याचा विचार आहे.

मला खात्री आहे की प्रत्येक श्रध्दावानासाठी हा अंक अमूल्य ठेवा असेल. गेल्या वर्षीच्या अंकातून बापूंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला अत्यंत वेगळ्या प्रकारेच उघड झाले होते. ह्या अंकात देखील तशीच नूतनता नवलाई सर्व वाचकांना नक्कीच अनुभवायास मिळेल. बापूंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू ह्या अंकात आपल्याला बघावयास मिळतील याची मला खात्री आहे. पावित्र्य हेच प्रमाण ह्या चौकटीत राहुन देखील खेळ, कला, साहित्य, मनोरंजन इत्यादी गोष्टी कुटुंबासहीत सहजपणे सांभाळायच्या त्यांचा निखळ आनंद घ्यायचे ह्याचे परिपूर्ण उदाहरण म्हणजे बापू. त्याच शिवाय अविरत कष्ट, सखोल अभ्यास, अफाट व्यासंग, आपल्या आसपासच्या परिस्थितीचे निरीक्षणोत्तर अचूक विश्लेषण, योग्य व्यायाम, इत्यादी गोष्टीं आपल्या जीवनात उतरवून आपले जीवन समृध्द बनवण्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बापू. बापूंच्या समर्थ व्यक्तिमत्वाविषयीचा हा अंक नववर्षाला मिळणे म्हणजे प्रत्येक श्रध्दावान बापू मित्रांसाठी सुवर्णसंधी आहे हे निश्चीत.

प्रत्येक श्रध्दावान बापू भक्ताला माझ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मागच्या गुरुवारी श्रीदत्तजयंतीच्या दिवशी बापूंनी श्रीमातृवात्सल्य उपनिषद सर्व श्रध्दावानांना अर्पण करुन येणार्या काळासाठी सर्व श्रध्दावानांची सोय केली त्याच बरोबर बापूंनी आपल्या श्रध्दावान मित्रांना या नव वर्षा करताच नव्हे तर प्रत्येक जनमाच्या प्रत्येक क्षणाकरता कायमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीदत्तजयंतीला बापूंनी दिलेल्या ह्या शुभेच्छांची क्लिपिंग सोबत देत आहे.